ITI GURUJI

Home

Facebook
WhatsApp
Telegram

 welcome to ITI GURUJI

तांत्रिक प्रशिक्षणात ITI चा महत्वाचा सहभाग आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर तांत्रिक प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले आणि फलस्वरूप संपूर्ण भारतामध्ये ITI ची  निर्मिती केली गेली. संपूर्ण भारतात एकच अभ्यासक्रम, संपूर्ण भारतात एकदाच परीक्षा हे ITI चे खास वैशिष्ट्य . लाखो तरुणांनी ITI मध्ये प्रशिक्षण घेऊन नोकरी, स्वतःचा व्यवसाय चालू केले आहेत. कमी वेळेत कमी खर्चात हमखास नोकरीची हमी फक्त ITI देऊ शकतो. या वेबसाईट वर याच ITI बद्दल आपण माहिती घेऊ या. 

ITI plays an important role in technical training. Special efforts were made for technical training after World War II and as a result ITIs were formed all over India. A single course all over India, a one-time exam all over India is a special feature of ITI. Millions of young people have taken up training in ITI and started their own business. Only ITI can guarantee a job in a short time and at low cost. Let us know about this ITI on this website.

about us

Hi guys!

नमस्ते

मी महाजन महेश एस.

INSTRUCTOR FOR TURNER

GOVT ITI LATUR

MOB. NO. 9421989575

सर्व प्रथम मी आपले या ठिकाणी स्वागत करतो. आयटीआय च्या प्रत्येक विद्यार्थ्याना दर्जेदार ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा, ज्या ठिकाणी आयटीआय विषयीचे ज्ञान, माहिती, प्रश्न संच सहज रित्या मिळावे म्हणून हा सर्व खटाटोप केला आहे. बाकीच्या शिक्षणाकडे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की , इतर सर्वच शैक्षणिक पर्यायामध्ये अनेक माहितीचे, ई लर्निंग चे स्त्रोत उपलब्ध आहेत, पण आयटीआय विषयी काही माहिती अथवा शैक्षणिक अभ्यास साहित्य घ्यायचे म्हटले की अगदीच तोकडे, कमी, किंवा अपूर्ण पर्याय सध्या ऑनलाइन उपलब्ध आहेत. ही कमतरता दूर व्हावी यासाठी मी 2017 पासून या वेबसाइट च्या माध्यमातून काहीतरी करावे या साठी प्रयत्न करत आहे. ही वेबसाइट परिपूर्ण आहे असे मी म्हणणार नाही , परंतु विद्यार्थ्याला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच आहे. त्या अनुषंगाने अजूनही ही वेबसाइट डेवलपमेंट च्याच मोड मध्ये आहे, राहील, कारण आयटीआय च्या विद्यार्थ्याना जे जे चांगल , जे जे उपयुक्त ते ते नेहमीच देण्याचा माझा प्रयत्न असेल. मला खात्री आहे, माझा हा प्रयत्न आपण सर्वाना नक्कीच आवडेल. आपण इथे भेट दिल्यानंतर संपूर्ण वेबसाइट एकदा पहावी ही विनंती कारण होऊ शकेल जे आपल्याला आवश्यक नाही ते दुसऱ्या कोणाला उपयोगी पडेल. अश्या प्रसंगी आपण ते इतराना जरूर शेयर करावे. काही सूचना असल्यास त्या जरूर द्याव्यात, आपल्या सुचनांचे सहर्ष स्वागत, कारण बदल, अपग्रेडेशन, ही काळाची गरज आहे. 

                                                                                      धन्यवाद..! 

                                                                           Mahajan Mahesh S.

 

 

 

Also Read...

Most Popular

Categories
Site Statistics
  • Today's page views: : 6
  • Total visitors : 503,563
error: Content is protected !!