ABOUT

नमस्ते

मी महाजन महेश एस.

INSTRUCTOR FOR TURNER

GOVT ITI LATUR

MOB. NO. 9421989575

सर्व प्रथम मी आपले या ठिकाणी स्वागत करतो. आयटीआय च्या प्रत्येक विद्यार्थ्याना दर्जेदार ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा, ज्या ठिकाणी आयटीआय विषयीचे ज्ञान, माहिती, प्रश्न संच सहज रित्या मिळावे म्हणून हा सर्व खटाटोप केला आहे. बाकीच्या शिक्षणाकडे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की , इतर सर्वच शैक्षणिक पर्यायामध्ये अनेक माहितीचे, ई लर्निंग चे स्त्रोत उपलब्ध आहेत, पण आयटीआय विषयी काही माहिती अथवा शैक्षणिक अभ्यास साहित्य घ्यायचे म्हटले की अगदीच तोकडे, कमी, किंवा अपूर्ण पर्याय सध्या ऑनलाइन उपलब्ध आहेत. ही कमतरता दूर व्हावी यासाठी मी 2017 पासून या वेबसाइट च्या माध्यमातून काहीतरी करावे या साठी प्रयत्न करत आहे. ही वेबसाइट परिपूर्ण आहे असे मी म्हणणार नाही , परंतु विद्यार्थ्याला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच आहे. त्या अनुषंगाने अजूनही ही वेबसाइट डेवलपमेंट च्याच मोड मध्ये आहे, राहील, कारण आयटीआय च्या विद्यार्थ्याना जे जे चांगल , जे जे उपयुक्त ते ते नेहमीच देण्याचा माझा प्रयत्न असेल. मला खात्री आहे, माझा हा प्रयत्न आपण सर्वाना नक्कीच आवडेल. आपण इथे भेट दिल्यानंतर संपूर्ण वेबसाइट एकदा पहावी ही विनंती कारण होऊ शकेल जे आपल्याला आवश्यक नाही ते दुसऱ्या कोणाला उपयोगी पडेल. अश्या प्रसंगी आपण ते इतराना जरूर शेयर करावे. काही सूचना असल्यास त्या जरूर द्याव्यात, आपल्या सुचनांचे सहर्ष स्वागत, कारण बदल, अपग्रेडेशन, ही काळाची गरज आहे. 

                                                                                      धन्यवाद..! 

error: Content is protected !!