ITI GURUJI

ओळख आय टि आय प्रवेश प्रक्रियेची INTRODUCTION OF ITI ADMISSION PROCESS IN MAHARASHTRA

Facebook
WhatsApp
Telegram

आय टी आय ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आय टी आय ला जोरदार प्रतिसाद मिळणार यात शंका नाही. आय टी आय म्हणजे नोकरीची हमखास संधी, तेही अत्यंत कमी कालावधीत ( एक किंवा दोन वर्षात ) मग तो कोणताही ट्रेड असो, अशी धारणा आहे आणि ती काही चूक नाही. दर वर्षी साधारणत: जून मध्ये आय टी आय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात होते. www.admission.dvet.gov.in या वेबसाइट वर जाऊन आपल्याला सुरुवातीला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. आपले नाव (जे मार्कमेमो वर असते ) व आपल्या आई आणि वडील यांचे नाव अचूक पणे भरावे लागतात. जर आपल्या दहावीच्या मार्क मेमो वर व आपल्या आधार कार्डात नावामध्ये बदल असेल तर त्यापैकी एक नाव कायम ठेवून दुसऱ्या ठिकाणी बदल करावा लागतो. उदा: जर आपले नाव मार्क मेमो वर योग्य आहे, पण आधार कार्ड वर चूक आहे तर आधार कार्ड वरील नावामध्ये बदल करून घ्यावा लागतो. इतरही काही बदल असतील तर तेही दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे, जसे की जन्म तारीख, पत्ता, इत्यादि.

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर जवळच्या कोणत्याही शासकीय अथवा खासगी आय टी आय मध्ये जाऊन आपल्याला आपला अचूक भरलेला अर्ज निश्चित (कन्फर्म ) करावा लागतो. अनेक जणांचा गैरसमज आहे की जर मला लातूर च्या आय टी आय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे पण मी तर सध्या पुण्यामध्ये राहतो, तर त्यासाठी मला लातूर ला जावे लागेल का ? तर त्याचे उत्तर आहे की असे काही नाही, महाराष्ट्रात कोणत्याही आय टी आय मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याच आय टी आय ला जाण्याची गरज नाही, जवळच्या कोणत्याही शासकीय अथवा खासगी आय टी आय मध्ये आपला अर्ज कन्फर्म करू शकतो. त्यासाठी ऑनलाइन अर्जाची एक प्रिंट तसेच दहावी ची , शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, जसे मुळ दाखला(TC) व त्याची झेरॉक्स प्रत, ही नसेल तर संबधित शाळेचा बोनाफाईड, जातीचे प्रमाणपत्र व त्याचे झेरॉक्स, मार्क मेमो व त्याची झेरॉक्स प्रत, ज्या वर्गाला नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र द्यावे लागते त्यांनी संबधित आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र व त्याचे झेरॉक्स (हे काढले नसेल तर सेतु केंद्रात जाऊन अर्ज करावा व त्याची पावती जोडावी ), आधार कार्ड झेरॉक्स, इत्यादि प्रमाणपत्र घेऊन अर्ज कन्फर्म करावा, अर्ज कन्फर्म केल्याशिवाय पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. अर्ज कन्फर्म केल्यानंतर आपल्याला ज्या ट्रेड ला / ज्या आय टी आय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते आपल्या अकाऊंट वर लॉगिन करून ऑनलाइन निवडावे लागतात. आपण 100 ऑप्शन निवडू शकतो. यानंतर DVET ने दिलेल्या वेळापत्रकांप्रमाणे सर्व प्रथम प्राथमिक गुणवता यादी जाहीर होते, ती आपण आपल्या अकाऊंट वर जाऊन पाहू शकतो. या गुणवत्ता यादी मधील आपल्या नावासमोर जर काही चुकीची नोंद असेल तर, म्हणजे जात, मार्क्स, अपंग, प्रकल्पग्रस्त, ब्भूकंपग्रस्त, इत्यादि बाबी मध्ये बदल असेल तर आपल्या अकाऊंट वर लॉगिन करून “हरकती नोंदवणे” फेरीत चुकीच्या नोंदीत योग्य बदल करावा. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरी साठी निवड यादी लागते. वेळापत्रका प्रमाणे पहिल्या फेरी साठी निवड झालेल्या विद्यार्थ्याना मोबाइल वर मेसेज येतो, तसेच आपल्या अकाऊंट वर सुद्धा आपण पाहू शकतो. दिलेल्या तारखेस संस्थेत स्वत: विद्यार्थ्याने उपस्थित राहून प्रवेश घ्यावा लागतो. इतर सर्व प्रवेश फेरीसाठी वेळापत्रका प्रमाणे निवड यादी ऑनलाइन जाहीर होत असते, आपल्या लॉगिन मधून आपण ती पाहू शकता.

अनेक वेळी असे होते की एकदा सुरुवातीला ट्रेड साठी ऑप्शन दिले की विद्यार्थी सहसा ते बदलत नाहीत. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे सर्वाना आवाहन आहे की प्रत्येक फेरीनिहाय शिल्लक जागा पाहून ऑप्शन बदलत राहावे. हे करण्यासाठी नेट कॅफे वर जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. आपण आपल्या मोबाइल वर गुगल क्रोम अथवा इतर ब्राऊजर वर जाऊन dvet च्या अॅडमिशन लिंक टाइप करून लॉगिन करावे लागते. आणि तिथे ऑप्शन टॅब वर क्लिक करून आपल्याला पाहिजे तो ऑप्शन निवडू शकतो , अगोदर दिलेले व आता आवश्यक नसलेले ऑप्शन डिलिट करू शकतो. तसेच आपल्या आवडीच्या ट्रेडचा ऑप्शन चा क्रम बदलू शकतो. अनेक जणांचा एक गैरसमज आहे की काही विशेष ट्रेड हेच चांगले आहेत, इतर ट्रेड तेवढे खास नाहीत. पण हा गैरसमज काढून टाका. आपल्या कडे मोबाइल आहे, कोणत्याही ट्रेड ची माहिती आपल्याला गुगल वर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे आय टी आय च्या प्रत्येक ट्रेड ला किती महत्व आहे, नोकरीच्या किती संधी आहेत, व्यवसाय करण्याच्या किती संधी आहेत, केंद्र सरकारच्या नोकरीच्या किती संधी आहेत, हे ज्ञात होईल.

निवड झालेल्या विद्यार्थ्यानी प्रवेशासाठी अलॉटमेंट लेटर स्वताच्या अकाऊंट वरुन डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्यावी व आवश्यक सर्व मुळ कागदपत्रांसोबत घेऊन यावे.

इथे एक लक्षात घ्यावे की आपण निवडलेल्या पहिल्या पर्याय (ऑप्शन ) ट्रेड ला जर आपली निवड झाली असेल तर आपल्याला प्रवेश घ्यावाच लागतो. तुम्ही प्रवेश घेतला अथवा नाही घेतला तरी ही तुम्ही प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतात. हेच दुसऱ्या फेरी साठी लागू आहे जिथे पहिल्या तीन पर्यायापैकी (ऑप्शन ) एखाद्या ट्रेड ला जर आपली निवड झाली असेल तर आपल्याला प्रवेश घ्यावाच लागतो. तिसऱ्या फेरी साठी पहिल्या पाच पर्यायापैकी (ऑप्शन ) एखाद्या ट्रेड ला जर आपली निवड झाली असेल तर आपल्याला प्रवेश घ्यावाच लागतो. चौथ्या फेरीसाठी कोणत्याही पर्यायापैकी (ऑप्शन ) एखाद्या ट्रेड ला जर आपली निवड झाली असेल तर आपल्याला प्रवेश घ्यावाच लागतो. पाचव्या फेरीसाठी कोणतेही आरक्षण लागू होत नाही, सर्व रिक्त जागा या सर्वसाधारण जागा म्हणून ओळखल्या जातात. प्रवेश फेरी मध्ये सर्व मुळ कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच काही प्रवेश शुल्क सुद्धा आपणास भरावे लागतात. त्याविषयी खाली माहिती दिली आहे.

खुल्या प्रवर्गासाठी 1550 + 600/- रु (डिपॉजिट ) असे 2150/- रु लागतात. काही ट्रेड साठी 1950/- रु लागतात.

राखीव प्रवर्गास 350 + 600/- रु (डिपॉजिट ) असे 950/- रु लागतात.

काही ट्रेड साठी शैक्षणिक पात्रता दहावी पास अथवा नापास आहे, ते ट्रेड खालील प्रमाणे आहेत.

 • तारतंत्री Wireman
 • नळकारागीर Plumber
 • Painter (General) पेंटर जनरल
 • Mason (Building Constructor) मेसन (गवंडी काम )
 • Carpenter(Wood work Technician) कारपेंटर (सुतार काम )
 • Welder (GMAW and GTAW)
 • Welder वेल्डर
 • Surface Ornamentation Techniques (Embroidery)
 • सुईंग टेक्नोलॉजी Sewing Technology
 • ड्रेस मेकिंग Dress Making

इतर सर्व ट्रेड साठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता दहावी पास (विज्ञान व गणित विषयसह ) आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी खालील माहिती पत्रक वाचावे.

Please wait while flipbook is loading. For more related info, FAQs and issues please refer to DearFlip WordPress Flipbook Plugin Help documentation.

आय टी आय प्रवेशचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

Please wait while flipbook is loading. For more related info, FAQs and issues please refer to DearFlip WordPress Flipbook Plugin Help documentation.

 

Also Read...

Leave a Comment

Categories
Site Statistics
 • Today's page views: : 9
 • Total visitors : 503,566
error: Content is protected !!